कोविड पॉझिटिव्ह पुरुष रुग्ण प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज पंढरपूर - आज २८ जुलै २०२० रोजी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथून गांधी रोड, पंढरपूर येथील कोविड पॉझिटिव्ह पुरुष रुग्ण यशस्वी नियोजन व औषध उपचार करुन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत डिस्चार्ज करण्यात आलेला आहे. उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे आजपर्यंत ७४ कोरोना संसर्गीत रुग्ण दाखल करण्यात आलेले आहेत त्यातील काही रुग्ण हे सौम्य व मध्यम प्रकारची लक्षणे असलेले होते त्यांना ऑक्सिजन देऊन त्यांची तब्येत स्थिर करून सलाईनद्वारे प्रतिजैविके देण्यात आली अस उपचार करून लक्षणे विरहित झाल्यानंतर त्यांना सीसीसी एमआयटी ,वाखरी येथे दाखल करण्यात आले होते तेथून त्यातील काही रुग्ण डिस्चार्ज करण्यात आले आहेत. सद्यस्थितीला उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे बत्तीस कोविड पॉझिटिव्ह असलेले रुग्ण ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्केपेक्षा कमी आहे अशा रुग्णांवरती ऑक्सिजन आणि सलाईन द्वारे प्रतिजैविके आणि अँटीव्हायरल औषध उपचार उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे सुरू आहेत आज अखेरपर्यंत उपजिल्हा रुग्णालय येथे सुमारे ३०० पेक्षा जास्त करण्यास अदृश्य संशयित रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे त्यांची covid-19 टेस्ट व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आलेली आहे त्यापैकी निगेटिव रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे पॉझिटिव्ह रुग्णांवर ती उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत अशी माहिती श्रीमती डॉ जे के ढवळे ,वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर यांनी दिली.


    उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे कार्यान्वित करून कोरोना संसर्गित रुग्णांसाठी यशस्वी नियोजन करून योग्य प्रकारे औषध उपचार करणाऱ्या वैद्यकीय टींममध्ये डॉ प्रदीप केचे-नोडल ऑफिसर, डॉ सचिन वाळुजकर- फिजिशियन, डॉ अनंत पुरी -भूलतज्ञ ,डॉ विराग दोशी- फिजिशियन,डॉ संभाजी भोसले,डॉ प्रसन्न भातलवंडे ,श्रीमती रेखा ओंभासे ,प्र सहा अधीसेविका व इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
 
Top