कोरोना जनजागृती मोहिमेचे शतक


  पंढरपूर,(नागेश आदापूरे),दिनांक-२०/०७/२०२० - कोरोनाचे जागतिक महामारीचा प्रभाव वाढल्या पासून पंढरपूर शहरात कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम येथील अँड वर्षा गायकवाड यरनाळकर यांनी सुरू केले. या चळवळीस सुरुवात करताना फलक लावणे, प्रबोधनात्मक घोषणा प्रसिद्ध करणे, जनजागृती बाबत रांगोळ्या काढणे, त्याचबरोबर रस्त्यावर प्रबोधनात्मक घोष वाक्य लिहिणे, लहान मुलांकडून घरबसल्या उपक्रम राबवणे तसेच दररोज आगळ्यावेगळ्या पद्धतीने व लोकांच्या मनाची पकड घेणारे लघु काव्य सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. 

   यासाठी पंढरपूर येथील साहित्यिक , लेखिका व कवयत्री सौ.लता भारत बहिरट यांनी या चळवळीत भाग घेऊन दररोज एक स्व रचित परिस्थितीनुरूप लघु काव्य रचून ती काव्ये अँड वर्षा गायकवाड यरनाळकर यांनी दृक श्राव्य असे दोनही माध्यमातून सादरीकरण केले व लघु काव्याची संहिता प्रसिद्ध केली. त्यास सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.

 या माध्यमांतून अँड.वर्षा गायकवाड यरनाळकर व लेखिका कवयित्री सौ लता बहिरट या दोघींनी मिळून सलग शंभर दिवस सातत्य राखून समाज प्रबोधन केले आहे त्यामुळे जनजागृती अभियान सक्षम करण्यासाठी हातभार लागला आहे,अशी माहिती अँड भारत बहिरट यांनी दिली.
 
Top