पंढरपूर, प्रतिनिधी- मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पंढरपूर येथील प्रथमेश दगडू कांबळे याने ८५% गुण मिळविल्या बद्दल त्याचा सत्कार देवराज युवामंचच्या वतीने करण्यात आला. प्रथमेश याने यश संपादन केल्याबद्दल देवराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाजी शिंदे यांनी त्याचा सत्कार केला.  

    यावेळी आकाश पवार, विकी काळे, निलेश गंगथडे आदी उपस्थित होते. प्रथमेश हा प्रतीक्षा एक्सप्रेस संपादक पत्रकार दगडू कांबळे यांचा सुपुत्र आहे. 
 
Top