पंढरपूरमधील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या ३००च्या घरात... 


शेळवे (संभाजी वाघुले) पंढरपूर शहराच्या विविध भागात सध्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतेय.सध्या विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या ३०० च्या घरात पोहचतेय.त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण कक्षात अनेक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. विलगीकरण कराव्या लागणार्‍या नागरिकांची संख्याही वाढतेय, त्यामुळे संस्थात्मक विलगी करणासाठी पंढरपूर शहराचे वेगवेगळे चार विभाग करावेत व त्या त्या भागातील नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणासाठी स्थानिक भागातील मठ आणि धर्मशाळा ताब्यात घेण्यात येत असुन संबंधित ठिकाणीच स्थानिक नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करावे, अशा सुचना पंढरपूर नगरपरिषदेचे बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांनी नगरपालिका प्रशासनास दिल्या आहेत. त्यानुसार नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचेसह नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पंढरपूरातील विविध भागातील मठांची पाहणी केली.


   स्थानिक नागरिकाचे जवळपास असलेल्या ठिकाणीच संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार्‍या नागरिकांना सोयीचे ठरेल. संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी पंढरपूरातील विविध मठांची व धर्मशाळांची पाहणी करुन मठाधिपतींना विलगीकरणासाठी मठ आणि धर्मशाळा ताब्यात द्याव्यात अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार ४ मठांमध्ये विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. संस्थात्मक क्वारंटाईन नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता आहे ती संस्थात्मक विलगी करणासाठीची व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे पंढरपूर शहराचे वेगवेगळे ४ विभाग करुन त्या त्या भागातील मठ, धर्मशाळा ताब्यात घेवून स्थानिक नागरिकांना आपापल्या भागातच संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरु आहेत, अशी माहिती बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
Top