मानवलोक महिला प्रकल्पाच्या संस्थापक डॉ.शैला भाभी लोहिया यांच्या सातव्या स्मृतिदिनी सामाजिक प्रश्नावर वेबिनारचे आयोजन...

       बीड दि.२४/०७/२०२० - मानवलोक मनस्वीनी महिला प्रकल्पाच्या संस्थापक डॉ शैलाभाभी लोहिया यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त मानवलोक परिवाराच्यावतीने वेबिनारचे आयोजन दि. २४ जुलै २०२० रोजी करण्यात आले होते. सध्या कोरोना महामारीमुळे शासकीय नियमानुसार जाहीर कार्यक्रम न घेता ऑनलाईन वेबिनारचे माध्यमातून करून प्रबोधनपार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सामान्य नागरिकांनीदेखील आपली जबाबदारी पाळली पाहिजे - आ.डाॅ नीलम गोऱ्हे  

यात माजी उपसभापती आ.डाॅ नीलम गोऱ्हे यांनी कोरोना काळातील महिलांचे प्रश्न व शासनाची भूमिका व्यक्त करत त्यांनी शासनाने केलेल्या वेगळ्या कामाचा आढावा घेत असताना सामान्य नागरिकांनीदेखील आपली जबाबदारी पाळली पाहिजे असे सांगितले. या कोरोनाच्या काळात मानवलोक संस्थांनी केलेली लोकहिताच्या कामाचे कौतुक देखील आ.डॉ.गोऱ्हे यांनी केले. 

    कोरोनाच्या काळात महिलांवर अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे असे एका संशोधनातून समोर आल्याचे आ.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. यामुळे स्त्री आधार केंद्र संस्थेने ज्याप्रमाणे ऑन लाईनच्या मदतीने महिलांना न्याय देण्यासाठी काम केले तसे काम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी महिलांचे प्रश्न सोडविण्या कडे कल द्यावा असे आवाहन देखील आ.डॉ.गोऱ्हे यांनी केले. डॉ. शैलाभाभी लोहिया यांच्या स्मृतीला उजाळा आ.डॉ.गोऱ्हे यांनी दिला.

पुढील पिढीला त्यांच्या सामाजिक कार्याची जाणीव व्हावी आणि सध्याचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक भान यावे यासाठी. मनस्विनी महिला प्रकल्पाच्या समन्वयक डॉ.अरुंधतीताई पाटील, अनिकेत भैया लोहिया कार्यवाह मानवलोक यांच्या संकल्पनेने "कोरोना आणि महिलांचे प्रश्न"या विषयावर वेबिनारचे आयोजन केले गेले होते.  

 ज्येष्ठ स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या मंगलताई खिंवसरा यांनी महिला हिंसाचार व करण्याची परिस्थिती यावर लॉकडाऊनच्या काळात महिला हिंसाचाराचे प्रकाराची उदाहरणासह माहिती दिली .

    डॉ. समीर गोरे,नवी मुंबई (मानसोपचार तज्ञ, अपोलो हॉस्पिटल,मुंबई) यांनी कोरोना काळातील परिस्थितीत घाबरून न जाता खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

   हा वेबिनार मानवलोक फेसबुक लाईव्ह असंख्य हितचिंतक मित्रपरिवार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाहिला व यात सहभाग नोंदवला.
 
Top