आरोग्य यंत्रणेवर ताण आल्यास अशा पेशंटची हेळसांड होऊ नये यासाठी

  पंढरपूर,(प्रतिनिधी)-पंढरपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याचबरोबर सस्पेक्टेड व कोमॉरबीड रुग्णांचीही वाढ होत आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्यास अशा पेशंटची हेळसांड होऊ नये यासाठी स्वतंत्र उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले.तसेच सस्पेक्टेड व कोमॉरबीड (न्यूमोनीया व इतर) रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वार्ड करण्यात यावे. यामुळे अशा पेशंटना योग्य वेळी,योग्य उपचार मिळतील, त्यांच्यावर लक्ष ठेवणे सोपे जाईल. यामुळे अशा नागरिकांना संजीवनी मिळेल, मनातील भिती कमी होईल व संभाव्य धोका कमी होईल असेही त्यांनी सांगितले.

पावसाला सुरवात झाल्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज

     पावसाला सुरवात झाल्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असुन सर्दी,ताप ,खोकल्याचे पेशंट वाढत आहे. आपल्या वेळेतुन वेळ काढून आपली जिवनशैली योग्य त्या रूटीनमधे म्हणजेच व्यायाम, प्राणायाम, योगासन, मेडिटेशन करुन प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. स्वत:ची योग्य ती काळजी घेऊन, डॉक्टरांची मदत घेऊन, खरी माहीती प्रशासनाला,आरोग्य विभागाला देवून सहकार्य करणे गरजेचे आहे. यापुढे सर्दी, ताप, खोकल्याचे पेशंट व कोरोनाचे पेशंट ओळखणे अवघड होत जाणार आहे. त्यामुळे गरज असणाऱ्या पेशंटना अँडमिट करुन, कमी रिस्क असणाऱ्या पेशंटना इतर ठिकाणी आयसोलेशन मध्ये ठेऊन तपासणी, औषध ,उपचार केल्यास,  कोव्हीड १९ ची तपासणी केल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल असेही त्यांनी सुचवले याची सर्व नागरिकांना मदत होईल. 

  वरील बाबींचा अभ्यास करुन योग्य त्या उपाययोजना करावी अशी विनंती आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी प्रांताधिकारी सचीन ढोले , आमदार प्रशांत परिचारक, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, बिडीओ रविकिरण घोडके,तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ जयश्री ढवळे, डॉ बजरंग धोत्रे,डॉ राजश्री सालविठ्ठल त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यावेळी केली .
 
Top