संगोबा मंदिर अत्यंत जुने व हेमाडपंथीय 

शेळवे ,(संभाजी वाघुले) - शेळवे ता.पंढरपुर येथील संगोबा मंदिर अत्यंत जुने व हेमाडपंथीय आहे.या मंदिरात प्रत्येक वर्षी महाशिवराञी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. संपुर्ण श्रावण महिना व श्रावणी सोमवारी दिवसभर हजारो भाविक दर्शन घेतात. परंतु कोरोनामुळे शेळवे परिसरातील  शेळवे देवडे, खेडभाळवणी, पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, भंडीशेगाव अशा सर्व गावातील भाविक दर्शनाला भल्या पहाटेपासुन येतात.परंतु आज श्रावणाचा पहिला सोमवार असुनही संगोबा मंदिरात शुकशुकाटच होता.

संगोबा मंदिर हे कासाळ ओढा व भिमा नदीच्या संगमावर

    शेळवे येथील संगोबा मंदिर हे कासाळ ओढा व भिमा नदीच्या संगमावर असल्यामुळे या मंदिराला संगोबा असे संबोधले जाते.या मंदिरातील पिंड अत्यंत जुनी व मोठी आहे . या पिंडीवरील शालिग्राम हा मोकळा आहे.असा शालिग्राम मोकळा असणारे असे मंदिर आसपास कुठेही पाहायला मिळत नाही.

   भिमा नदी पाञ व कासाळ ओढा यांच्या संगमा पासुन अवघ्या २०० फुटावर हे संगोबा मंदिर आहे. भिमा नदीला आजपर्यंत आलेल्या पुरात एकदाही या मंदिरात पाणी गेलेले नाही. या मंदिराच्या आसपासची गावे शेळवे ,पिराची कुरोली या गावात पाणी शिरते परंतु संगोबा मंदिराच्या खालील पायरीपर्यंतच पाणी येते.

     या संगोबा मंदिराच्या बाहेरील उजव्या बाजुस मोठा दगडी कुंड आहे.मंदिराच्या बाजुला जुन्या दगडी कोरीव शिळा आहेत.मंदिराच्या पुढील बाजुस लहान व मोकळा शालिग्राम असणारी पिंड आहे.

   भिमा नदी व कासाळ ओढा या संगमावरही एक मंदिर असल्याच्या खुणा आहेत. मागील काही वर्षापुर्वी नदीपाञ (चवञा) संपुर्ण कोरडे पडल्या नंतर या ठिकाणी मंदिर असल्याच्या खुणा आढळल्या होत्या . सद्या या संगमावर म्हणजेच चवञ्यावर (संगम) ८ ते १० फुटापेक्षा जास्त पाणी आहे.
 
Top