३० जुलैपासून नवम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनास प्रारंभ

    सोलापूर,दि,२८.७.२०२०- हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ३० जुलै ते २ ऑगस्ट आणि ६ ते ९ ऑगस्ट २०२० या कालावधीत होत आहे. या पूर्वी झालेली सर्व अधिवेशने गोवा येथे घेण्यात आली.या वर्षी मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे हे अधिवेशन ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात येणार आहे. या समवेतच ‘हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशन’ १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. आजवर झालेल्या आठ अधिवेशनांना प्रती वर्षी मिळणारा प्रतिसाद वाढत जाऊन अष्टम् ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशना’ला २५ राज्यांतील एकूण १७४ हिंदु संघटनांचे ५२० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

    या अधिवेशनांचे वैशिष्ट्य म्हणजे भारताशिवाय नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश येथूनही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातही देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती यांसह सोलापूर जिल्ह्यातील अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे प्रवक्ता ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, हिंदू महासभेचे अध्यक्ष बाळकृष्ण डिंगरे, पेशवा युवा मंचचे सचिव गणेश लंके, अधिवक्ता लक्ष्मण मारडकर, अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी, माजी नगरसेवक बापूसाहेब ढगे, रोटरी क्लब ऑफ सांगोला येथील माजी अध्यक्ष आणि क्लब ट्रेनर अभियंता संतोष भोसले, सनदी लेखापाल श्रीनिवास वैद्य,अधिवक्ता रमाकांत बापट,शिवराज पडशेट्टी, बार्शी येथील विनय संघवी, आनंद सोमाणी हेही ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी होणार आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे . 

विशेष ऑनलाईन परिसंवादांचे आयोजन करण्यात आले, या परिसंवादाच्या माध्यमांतून  

     अधिवेशनाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाने ‘लॉकडाऊन’ च्या कालावधीत चालू घडामोडींविषयी विशेष ऑनलाईन परिसंवादांचे आयोजन करण्यात आले, या परिसंवादाच्या माध्यमांतून देशभरातील लक्षावधी लोकांमध्ये जागृती झाली, हिंदुत्ववादी संघटनांकडून एकत्रितपणे ‘मंदिर-संस्कृती रक्षण अभियान’ या नावाने आयोजित विविध बैठका आदींच्या माध्यमांतून जनजागृती चळवळ उभारण्यात आली आहे.                           
 
Top