पालकांसाठी मार्गदर्शनपर ऑनलाईन वेबिनार

    पंढरपूर - कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रसिव एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूलमध्ये पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शनपर ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला. या वेबिनारमध्ये पहिली आणि दुसरीमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना पंढरपूर येथील डॉ. संगीता पाटील यांनी मार्गदर्शन केले.

शाळा प्रत्यक्षात सुरू करणे सध्या तरी अशक्य 

     सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू करणे सध्या तरी अशक्य आहे.परंतु राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष जून पासून चालू केलेले आहे. शासन निर्णयानुसार पहिली आणि दुसरी मधील विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे चालू ठेवावे यासाठी पालकांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते.कोरोनामुळे बदलेल्या परिस्थितीत पालकांच्या आपल्या पाल्याच्या बाबतीतल्या जबाबदाऱ्या देखील बदलल्या आहेत. त्यानुसार लोटस इंग्लिश स्कूलने वेबीनारच्या माध्यमातून पालकांशी विविध विषयांवर संवाद साधला.

ऑनलाइन शिक्षण हा बदल स्वीकारण्याची मानसिकता

    यामध्ये प्रामुख्याने मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण, लहान मुलांच्या रागावर नियंत्रण कसे आणता येईल,मोबाईल गेममुळे होणारे दुष्परिणाम, आई-वडिलांबरोबर मुलांचं असणारं नातं, ऑनलाइन शिक्षण हा बदल स्वीकारण्याची मानसिकता आणि  क्षमता जागृत करणे, घरची ऑनलाइन शाळा,शाळेकडून मिळणाऱ्या माहिती मध्ये भर घालून ती मुलांना देणे ही काळाची गरज इत्यादी विषयांचा समावेश होता.

   या ऑनलाईन वेबिनार मिटिंगसाठी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त व खजिनदार दादासाहेब रोंगे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पडवळ हे उपस्थित होते. या वेबिनार मिटींगचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या प्रमुख सविता झांबरे यांनी केले. प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण यांनी वेबिनार मधील मुद्दे मांडले .शिक्षिका प्रतिभा नाईकनवरे यांनी आभार मानले.
 
Top