या महामंडळाना शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा

   पंढरपूर,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग अधिपत्याखाली असणा-या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ ,लोकशाहरी आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती जमाती विकास महामंडळ या महामंडळांचे कामकाज गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक निधीअभावी पुर्णतः ठप्प झाले असून या महामंडळाना शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी केली आहे. 

   त्यामुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली

    देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शासनाला लाॅकडाऊन करावे लागेल त्यांचा परिणाम सर्व क्षेत्रातील व्यवहारांवर झाला आहे. त्यामुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे.  शासनाने या महामंडळामार्फत मागासवर्गीय घटकातील विविध जाती जमातीतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.केंद्र व राज्य शासन या मागासवर्गीय समाजाच्या सार्वजनिक कल्याणा साठी मोठ्या प्रमाणात दर वर्षी आर्थिक निधी उपलब्ध करून देते मात्र गेल्या अनेक वर्षापासून महामंडळाकडून पाहिजे त्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जात नसेल तर मागासवर्गीय समाजासाठी तरतुद केलेला निधी कोठे जातो असा सवालही संदिप मुटकुळे यांनी केला आहे. महामंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून संचालक मंडळ नेमणूक केलेल्या नाहीत.त्या नेमणूकाही कराव्यात व महामंडळाच्या विकासाला चालना द्यावी,अशी मागणी शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केली आहे.
 
Top