कु.सावनी तारकेश्वर दोशी हिने १०० टक्के गुण प्राप्त करून राज्यात प्रथम


   पंढरपूर,(विजय काळे) -मार्च 2020  मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने नुकताच जाहीर झाला यात कवठेकर प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु.सावनी तारकेश्वर दोशी हिने १०० टक्के गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. प्रशालेचा निकाल ९६.६६ टक्के लागला असून  प्रशालेतून अनुक्रमे कु.सावनी दोशी १०० टक्के, प्रथम, आशीर्वाद राजेश्वर कटकमवार ९८.६० टक्के व्दितीय, कु.सायली नरेंद्र भंडारकवठेकर ९८.४० टक्के तृतीय क्रमाने उत्तीर्ण झाले आहेत. ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २१ असून ९० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी ७३ इतकी आहे. 


   सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक ,अध्यक्ष वा.ना.उत्पात संस्थेचे सचिव मो.चि.पाठक,वा.गो.भाळवणकर,  पदाधिकारी नानासाहेब रत्नपारखी, सु.रा.पटवर्धन व सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एस.पी.कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका श्रीमती अंजली बारसावडे,पर्यवेक्षक व्ही. एम.कुलकर्णी, आर.जी.केसकर ,एन.बी.बडवे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी केले.
 
Top