पुणे येथील कर्वे रोडवरील गॅलक्सि हॉस्पिटल हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्या मुळे हॉस्पिटलवर कारवाई व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

     

        पुणे- वडगाव मावळ येथील दत्तात्रय भिकू ढोरे हे कर्वे रोडवरील गॅलक्सि हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी अँडमिट झाले होते व त्यांचा सोमवारी रात्री कोरोना चाचणीसाठी स्वँब घेण्यात आला व मंगळवारी रिपोर्ट आला असता त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार होत नाही असे सांगून त्याना हॉस्पिटलमधून बाहेर काढले, कोरोनाच्या सध्या पुणे जिल्हयात सुरू असलेल्या महामारीचा विचार न करता त्यांची कसल्याही प्रकारची व्यवस्था करता त्याना वाय सी एम हॉस्पिटलला पाठवून दिले.     

 वायसीएममध्ये बेड उपलब्ध नाही आहेत,हे माहिती असून हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्या कोरोना रुग्णाला आपला जीव गमवावा लागला, आपण ह्या हॉस्पिटलवर लवकरात लवकर कारवाई करावी व हॉस्पिटलच्या संचालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टी या हॉस्पिटल विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे निवेदन अजित प्रकाश संचेती युवा प्रदेशाध्यक्ष व जन संपर्क प्रमुख,महाराष्ट्र राज्य भारतीय राष्ट्रवादी पार्टी,(युवा मोर्चा) यांनी दिले आहे . 

   या निवेदनाच्या प्रति राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे,गृहमंत्री अनिल देशमुख,पुणे जिल्हा अधिकारी रामकिशोर नवल,पुणे विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसकर यांना पाठविण्यात आहेत. 
 
Top