आरोग्य सभापती विवेक परदेशी यांचेकडून नगरपालिकेला ८ इलेक्ट्रॉनिक अँटोमँटिक पंप भेट


इलेक्ट्रॉनिक अँटोमॅटिक पंपाच्या मदतीने होणार जलद फवारणी 


    पंढरपूर - नगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करत असताना, ठरलेल्या पद्धतीने काम करण्यापेक्षा विचार विनिमयाने नवनवीन पध्दती शोधुन त्या आमलात आणुन कमी कष्टात जलद रितीने काम कसे करता येईल याचा आरोग्य विभाग सतत अभ्यास करत असल्याचे सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले. आमचे सफाई कर्मचारी ,नागरी हिवताप विभागातील कर्मचारी हे कंटेनमेंट झोनमध्ये,पॉझिटिव्ह नागरिकांच्या घरा कडील परिसरात, कोव्हिड केयर सेंटरमध्ये सफाई, फवारणी करत असतात. त्याच्या या कामामध्ये अत्याधुनीक मशीन वापरल्यास जलद गतीने काम होईल व काम करण्यातील धोका कमी होईल त्यामुळे नगरपालिकेला सभापती विवेक परदेशी यांच्यावतीने अत्याधुनिक आटोमॅटिक  इलेक्ट्रॉनिक हँडपंप आठ नग देण्यात आले. 

   यामुळे वाढत्या कंटेनमेंट झोनमध्ये कमी वेळे मध्ये जास्तीत जास्त भागाचे निर्जंतुकीकरण करणे सोपे झाले आहे. सध्याचे वाढते कंटेनमेंट झोन व त्यासाठी नगरपालिकेला आत्यावश्यक सेवेस खर्च करण्यासाठी निधी शेवटपर्यंत पुरावा  व तातडीने पंप उपलब्ध व्हावेत यासाठी सदर पंपं उपलब्ध करुन दिले असल्याचे सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले. 
             
   मुत्यु दर कमी करण्याचा प्रशासन,आरोग्य विभाग खुप प्रयत्न करत आहे. सदर उपचार होत असताना विविध अत्याधुनीक यंत्र, मशीन उपलब्ध झाल्यास अनेक नागरिकांना याचा उपयोग होईल. यासाठी प्रशासन , नगरपरिषद प्रयत्न करत आहे. पंढरपूरतील सामाजिक संस्था, विठ्ठल रुक्मिणी मंदीर समीती, सर्व सेवाभावी व खाजगी संस्था, सामान्य नागरिक ,दानशुर व्यक्ती यांनी आपल्या ताकदीप्रमाणे अत्यावश्यक वस्तु , मशीनरी उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांना तातडीने याचा उपयोग होइल. प्रशासनाला,आरोग्य विभाग, डॉक्टर, नर्स यांना सेवा करताना, जबाबदारी निभावताना मोलाची मदत होईल व रूग्णांचे जीव वाचतील, त्यासाठी इच्छुकांनी प्रशासनाशी आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन आरोग्य सभापती परदेशी यांनी केले आहे. 
        
    सदर प्रसंगी नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर,नरेंद्र डांगे, हिवताप अधिकारी किरण मंजुळ, संजय देशमुख,नामदेव सर्वगोड, उमाकांत सगरे आदी उपस्थित होते.
 
Top