खाजगी दवाखान्यांतील उपचाराच्या बिलांचे होणार लेखा परीक्षण

      शेळवे (संभाजी वाघुले) - खाजगी दवाखान्यांतील उपचाराच्या बिलांचे लेखा परीक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील आठ तालुक्यात लेखापरीक्षण अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. याबाबत त्यांनी काल आदेश जारी केले होते. 

उपचारांची मोठ्या रक्कमेची बिले आकारल्याच्या तक्रारी

     खासगी रुग्णालयांतून उपचारांची मोठ्या रक्कमेची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बिले तपासण्यासाठी लेखा परीक्षक नियुक्त करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मंगळवेढा, सांगोला, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस आणि बार्शी या तालुक्यात अधिकारी नियुक्त करण्यात आले. उर्वरित दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ या तालुक्यात अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
Top