कोरोना योद्धा पुरस्कार 

  बारामती ,२०/०७/२०२० - सौ कुसुम व श्री जिनदत्त शहा वेलफेयर फॉउंडेशन,पूणे (बारामती) तर्फे स्वर्गीय श्रीमान शेठ जिनदत्त चंदुलाल शहा (सराफ) यांच्यातर्फे  कोरोना बाधितांना मदत करणाऱ्या मधुर भैय्याजी जैन संघ,पुणे व शांती विद्या ध्यान संवर्धन समिती, सांगलीचे तात्या भैय्याजी यांना देण्यात आले. 

पुरस्कार रक्कम कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी उपयोग 

   याप्रसंगी तात्या भैय्याजी व मधुर भैय्याजी यांनी वेलफेयर फॉउंडेशनचे किशोर शहा व अतुल शहा व सराफ परिवारा विषयी आभार व्यक्त केले . त्यांनी या जिनदत्त स्मृती सन्मानाची रक्कम जैन संघ, पुणे व शांती विद्या संवर्धन समिती, सांगलीच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी उपयोग करू असे सांगितले. 

     या प्रसंगी किशोर शहा म्हणाले कि, आम्ही नेहमीच अशा प्रसंगी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करीत असतो.

     या वेळेस हा उपक्रम कोरोना महामारी लॉकडाउनमुळे ऑनलाईन करण्यात आला.यावेळी श्रीमती कुसुम शहा, अतुल शहा, सौ संगीता शहा, सौ नेहा शहा, सिध्दार्थ शहा,सौ अंकिता शहा, सम्यक शहा, शितल पाटील, स्विटी बागी, साहस बागी आदींनी या आँनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली.  

 
Top