पंढरपूर -दिनांक-१७/०७/२०२० रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत शिवाजी बळीराम भोसले, राहणार आंबे , तालुका पंढरपूर येथे वरील शासकीय आदेशाचे उल्लंघन करून साथीचे रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असताना सुद्धा जाणीवपूर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित करुन सदर कार्यक्रमास गावातील ३० ते ४० लोक उपस्थित राहिले, त्याचप्रमाणे मंगळवेढा सब जेलमध्ये अटकेत असलेला तानाजी बळीराम भोसले यास मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उदय ढोणे व बजरंग माने हे दोघेजण यांना जेवणासाठी बोलावून गावांमध्ये साथीचे रोग पहिला फैलावेल अशी कृती करून व सदर जेवणास तानाजी बळीराम भोसले, पोलीस कर्मचारी ढोणे, माने व गावातील इतर ३० ते ४० नागरिक उपस्थित राहिले, म्हणून फिर्यादी प्रकाश तानाजी गुजले वय ३० वर्षे, धंदा-नोकरी (तलाठी आंबे)रा.वाकी शिवने तालुका-सांगोला ने सरकारतर्फे शिवाजी बळीराम भोसले, तानाजी बळीराम भोसले ,पोलीस कर्मचारी ढोणे आणि पोलीस कर्मचारी माने , मंगळवेढा पोलिस ठाणे व गावातील इतर ३० ते ४० लोकांचे विरुद्ध भा.द.वि कलम १८८ ,२६९ ,२७० सह आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१(ब), भारतीय साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २,३, महामारी रोग सुधारणा अध्यादेश २०२० चे कलम ३(१)(अ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. म्हणुन वगैरे मजकूरची फिर्याद दिल्याने सदर गुन्हा दाखल करून कोर्टात पाठवून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल १५८३ मोरे हे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली करत आहेत.  
 
Top