ओंकार जोशी मित्र परिवाराचा अनोखा उपक्रम
   पंढरपूर (प्रतिनिधी) -येथील ओंकार जोशी मित्र मंडळ आणि घोंगडे गल्ली परिवाराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२९ रक्त दात्यांनी रक्तदान केले. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून या रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. 

   शिवराज्याभिषेकदिना निमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओंकार जोशी मित्र परिवार आणि घोंगडे गल्ली मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदाऊ शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदरच्या शिबीराचे उद्घाटन अनिल काका बडवे,  प्रशांत वांगीकर सर,गोविंद भातलवंडे,विनय महाराज बडवे ,राजू उराडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. 

यावेळी १३२ वेळा रक्तदान केलेल्या भजनदास लेंगरे यांचा सत्कार करण्यात आला. 

 याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्यास आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक मास्क आणि सनिटायझर भेट देण्यात आले आहे. याप्रसंगी घोगडे गल्लीतील सर्व सदस्य आणि ओंकार जोशी मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.  
 
Top