राज्यात परत लॉकडाऊन लावून दुकाने बंद करण्याच्या बातम्या चुकीच्या -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  मुंबई - काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे.आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. 

   पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच आहे. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

   अनेक ठिकाणी मास्क न लावणे, गुटखा तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकणे, गर्दी करणे या गोष्टी सुरु आहेत. शासनाच्या,पोलिस प्रशासनाच्या सूचना डावलून बरेच नागरिक या सर्व गोष्टी करत आहेत. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना कोणालाही नकळत घरात घेणे या गोष्टी घडत आहेत त्यामुळे त्या त्या शहरात धोका निर्माण होत आहे. यावर शासनाने नाहीतर नागरिकांनी हा धोका ओळखून आपणं आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. गुटखा,तंबाखू विकणारांवर आणि त्यापेक्षा बनवणारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.  
 
Top