येथे संविधान नाही, सुव्यवस्था नाही
नाती मातीमोल, प्रतिष्ठा नाही
जगण पशूतूल्य,अनेक तुम्बलेली गटारे 
येथे येतात क्षणात मोकळं होतात 
क्षणभर विश्व अधिपति होतात 
कूजलेल्या,सडलेल्या 
निर्जीव शरिरावर स्वार होतात 
स्वतः योद्धा समजून विजयोन्मादाने 
आमच्या छताडावर नाचतात 
पैसे देतात अन मुकाट जणू ओळख नाही 
असं दाखवत तोंड लपवत निघून जातात 
त्यांना प्रतिष्ठा आहे पण आम्हांस हिणवतात 
वारांगना म्हणून वहान भाड्याने करावे 
तसे ते आमच्या योनीला भाड्याने घेतात 
खरे भाड्खावू कोण ?
सरकार, महापालिका,नगरसेवक 
मंत्री मुख्यमंत्री अधिकारी कोण
येथे येतो ? ते यालाच नर्क समजतात 
येथे येणे ते घृणास्पद मानतात 
उपभोगता येथे हीरो तर 
आम्ही झिरो ठरले जातोत 
हा कुठला न्याय ?
खरं तर ते आमच्यापेक्षाही मोठ्या 
वारांगना आहेत, धंदेवालें आहेत 
येथे येणाराही अपवित्र ठरतो 
येथे माता भगिनी नाहीत का 
बिनबापाच्या का अनेक बापाच्या 
लेकरांना जगण्याचा हक्क नाही का ?
महारोगीदेखील चांगल जगतात, 
पण आम्ही कसे जगतोत ?
कोण विचारतो ना बाप ना आईं
ना भाऊ ना बहीण 
आहेत ते सारे भोगी अन शोषणकर्तेच !!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००


 
Top