गेली तीन महिने झाली कोविड १९ या रोगामुळे पंढरपूर बंद आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून बेघर गरीब,अडकलेले वारकरी यांच्यासाठी टाळेबंदी झाल्यापासून ३१ मे पर्यंत जेवणाची पाकिटे तयार करून दिली आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने टाळे बंदीवरील काही निबंध शिथिल केलेले असले तरी पंढरपुरातील हातावरील पोट असणारे कुटुंबाना दोन वेळेचे पुरेसे अन्नही मिळत नाही .चैत्री वारी रद्द झाली आता आषाढी यात्रा हि रद्द झाली आहे. त्यामुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.या उपासमारीमुळे अनेक कुटुंब हतबल झालेले आहेत.

आजपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांनी बेघर,बाहेरील वारकरी,गरीब, भिकारी, अपंग यांना अन्न पुरवठा केल्याप्रमाणेच पंढरपुरातील नागरीकां साठीही अन्नाचे पाकिटे तयार करून श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज भवनमध्ये असलेले अन्न छत्रामधून ती पाकिटे पंढरपुरातील गरजूंना येऊन घेऊन जाण्याची व्यवस्था करावी .

याचा गांभीर्याने विचार करून बंद केले अन्नछत्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी शिवबुध्द संघटना व आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन वतीने करण्यात आली आहे.विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुलडवाड यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.यावेळी निवेदन देताना शिवबुध्दचे संदिप मुटकुळे,आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर कदम,औंकार चव्हाण, गणेश निंबाळकर, सतिश माने,शेखर भोसले, गणेश थिटे आदी उपस्थित होते.
 
Top