पंढरपूर - राष्ट्रीय कांग्रेसचे नेते राहूल गांधी यांचा वाढदिवस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे ओबीसी  विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस ओबीसी विभाग पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्यावतीने 
पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा करून साजरा करण्यात आला.

     यावेळी गणेश भोसले,वैभव वाघमारे,राजू देवकर, प्रशांत महागावकर, सूनिल भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 ओबीसी काँग्रेसचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर हे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवितात.सध्या त्यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षा रोपण आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावावे.
 
Top