शेळवे,(संभाजी वाघुले) - रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी २ जुन रोजी आपापल्या तहसिलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले . कोरोना COVID -१९ या रोगामुळे भारतातील सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योग व्यवसाय बंद झाले असल्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नागरिकांना उपलब्ध नाही . सरकारने देऊ केलेल्या रेशन आणि गहू यामुळे जीवनाश्यक गरजा पूर्ण होत नाहीत.आपले घर संसार चालविण्यासाठी नागरिकांसमोर आता कोणताही मार्ग उरलेला नाही . या पार्श्वभूमीवर जे नागरिक कोरोनामुळे बाधित झाले आहेत.अशा अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत अनेक नागरिकांना लाखो रुपये कर्ज स्वरूपात उभे करून खर्च केल्या नंतर त्यांना कोरोना वरील उपचार मिळाले आहेत. 

     रुग्ण हक्क परिषद, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अंतर्गत आम्ही सर्वच तालुक्यातील व राज्यातील सर्वच जिल्हाअंतर्गत रुग्ण हक्क परिषद तालुका व जिल्हा कमिटीच्यावतीने आमच्या तालुक्याचे तहसीलदार व आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपणास खालील मागण्यांचे निवेदन सादर करीत आहोत.या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमची भूमिका तीव्र आहे. जर या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर सनदशीर व लोकशाहीच्या मार्गाने अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल . तरी निवेदनाचा आदर राखून जनतेच्या हितासाठी असलेल्या मागण्या तातडीने मंजूर कराव्या हि नम्र विनंती .  

* आजपर्यंत ज्या रुग्णांनी पैसे भरून कोरोना वरील उपचार मिळविले त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत . 

* सर्व प्रकारच्या खाजगी व धर्मदाय हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचार नागरिकांना मोफत मिळाले पाहिजेत. 

*जीवनाश्यक वस्तू खरेदी करून घर चालविण्या साठी प्रत्येक कुटुंबास १० हजार रुपये आणि 
कोरोनाची चाचणी व तपासणी मोफत झालीच पाहिजे . 

*सर्व प्रकारच्या उद्योग व व्यवसायांना गती देऊन आर्थिक उत्पन्नाचे स्रोत तातडीने सुरु झाले पाहिजे 
 
  रुग्ण हक्क परिषद या संघटनेच्या या मागण्या मान्य करण्याचेही आव्हान या निवेदनामार्फत करण्यात आले.सोलापुर जिल्हाध्यक्ष दिपक काकडे यांच्या मार्गदर्शनात संपुर्ण जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांसह व इतर ५ जणांच्या शिष्टमंडळानी सोशल डिस्टन्स पाळतच हे निवेदन दिल्याची माहीती रुग्ण हक्क परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिपक काकडे यांनी दिली.

   यावेळी पंढरपूर तहसिलदार डॉ वैशाली वाघमारे यांना निवेदन देताना संभाजी वाघुले ,शैलेंद्र मस्के शहाजी गोफणे ,जितेंद्र शिंदे व जयसिंग मस्के आदी उपस्थित होते .
 
Top