पंढरपूर - राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्याबद्दल भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी अतिशय निंदनिय,संतापजनक व जनमानासात उद्रेक निर्माण करणारे वक्तव्य केले आहे.त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      याबाबत बोलताना गणेश गोडसे म्हणाले, आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीला बळ दिले अनेक वेळा अडचणीत आलेली साखर कारखानदारी सांभाळली.देशाचे कृषिमंत्री असताना देशातील सर्वात मोठी पहिली कर्जमाफी शरद पवार यांनी केली. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल करीत असलेल्या ज्येष्ठ नेत्याबाबत अशा पद्धतीची टीका करणे गोपीचंद पडळकर यांना शोभत नाही.गोपिचंद पडळकर यांनी काढलेले उदगार हे भावना दुखावणारे व राज्यात विद्वेष भडकावणारे वक्तव्य आहे.त्यामुळे गोपिचंद पडळकर याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

   हे निवेदन देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,रेवण जाधव,विकास घोलप आदी उपस्थित होते.
 
Top