कोरोनाच्या भीषण महामारीत जगाबरोबरच महाराष्ट्र राज्य झुंजत आहे. सर्व डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा , प्रशासन जीव धोक्यात घालून दिवस रात्र सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्ताच्या तुटवडा असल्याने महाराष्ट्रातील जनतेला व कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.


  या आव्हानाला प्रतिसाद देत मौजे खळवे, ता. माळशिरस येथे जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ व खळवे ग्रामस्थांनी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून लोकनेते स्व.दत्ता आप्पा वाघमारे यांच्या पुण्य स्मरणानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीरात १२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग घेतला. 

   शिवसेना जिल्हाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी युवासेना जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील वाघमारे,माजी सरपंच अण्णासाहेब कदम, तात्यासाहेब सावंत, युवासेना तालुका समन्वयक भगवान पाटील, दीपक पाटील, प्रहार विद्यार्थी संघटनेचे किरण भांगे, अक्षय ब्लड बँकेचे डॉ.वाघमोडे,ग्रामसेवक गीते आदि उपस्थित होते.

   रक्तदान शिबीर आयोजन व यशस्वी करण्या साठी दादासाहेब ननवरे, शिवाजी ननवरे, विठ्ठल ननवरे,हनुमंत ननवरे,दिगंबर ननवरे,ह.भ.प.संतोष ननवरे ,सुधाकर ननवरे ,समाधान ननवरे ,विक्रम पिसे,नवनाथ चव्हाण, विजय कवलगे आदीसह ग्रामस्थ व युवक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. शिबीरासाठी अक्षय ब्लड बँक माळशिरस शाखा यांनी सहकार्य केले. रक्तदात्यांना मास्क व पिण्याच्या पाण्याचे जार वाटप करण्यात आले.
 
Top