पंढरपूर,(नागेश आदापूरे) - कोरोनाच्या संसर्गामुळे लाँकडाऊन केल्याने झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई व्यवसाय चालू करण्यास परवानगी मिळण्याबाबत पंढरपुरातील बँड व्यवसायिकांनी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन दिले.

 बँड वाजवून उपजीविका करणाऱ्या बँडवाल्यांची संघटना असून कोरोनाचा विषाणु पसरल्याने बँड वाल्यांच्या उपजिविकेवर बंधन आली.लग्न कार्य आणि इतर समारंभ बंद झाल्यामुळे पाचशे लोकांचे कुटुंब या बँड वादनावर जगत आहे त्यांची उपासमार होत आहे .सध्या कमीत कमी माणसांचे उपस्थितीमध्ये लग्नकार्य पार पडत आहे त्यामुळे आम्हा बँडवादकांना किमान पाच ते सहा जणांना तरी बँड वाजविण्याची परवानगी मिळावी कारण घडशी समाज हा बँड वाजून करून त्यावर उपजीविका करत आहे आणि बँडवादन ही एक कला आहे .या आगोदरच डाँल्बीमुळे आमच्या व्यवसायावर गदा आली आहे. बँड व्यवसायिकांना जानेवारी ते मे असे पाच महिने काम असते परंतु लॉकडाऊन मुळे लग्नकार्य थांबली आहेत.
ग्राहकांनी लग्नासाठी तारखा बुकिंग केल्या व आगाऊ रक्कम जमा केल्या आहेत. त्या बुकिंगच्या भरोशावर या व्यवसायिकांनी सावकारी कर्ज तर कोणी इतर बँकांचे कर्ज काढले काही जणांनी घरातील वस्तू विकून साधन सामुग्री जमा केली आहे मात्र चालू हंगामात आमचा व्यवसाय उध्वस्त झाला आहे त्यामुळे आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बँडवादक यांना दिलासा द्यावा असे निवेदन महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटना सोलापूर जिल्हा यांच्यावतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश वनारे,किशोर जाधव, सागर जाधव,धनंजय जाधव,अमर वनारे ,उमेश धुमाळ,दिगंबर भोसले,शिवहार भोसले,सुरेश भोसले ,पोपट वनारे,पार्थ वनारे,सचिन भोसले आणि घडशी समाज यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना दिले आहे .
 
Top