पंढरपूर - रविवारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या २९५ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यामध्ये शहरातील अहिल्यादेवी मंदिर संस्था नाथ चौक, होळकर सरकार वाडा महाद्वार ,अहिल्यादेवी मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती पंढरपूर यांच्या वतीने सामाजिक भान ठेवून जयंती साजरी केली.

 या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाज बांधव उपस्थित होते. सोशल डिस्टन्स राखत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी आमदार प्रशांत परिचारक, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे ,भगीरथ भालके,नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले,नागेश भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,पक्षनेतें संग्राम अभ्यंकर,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर,विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

       याप्रसंगी धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपुरकर, माऊली हळणवर , शालिवाहन कोळेकर ,बाळासाहेब गडदे, बाबा लगसकर , अण्णा सलगर, प्रशांत घोडके, पंडित शेंबडे, बबन येळे,प्रशांत कोल्हापूरकर ,अण्णा सोनलकर आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top