समाजातील विविध मुलभूत प्रश्न,पर्यावरण विषयक निर्माण झालेल्या अनेक समस्या-आव्हाने जर खर्या अर्थाने सोडवायच्या असतील, त्या बाबतीत योग्य ती ध्येय-धोरणे आखायची असतील तर राज्याच्या सर्वोच्च सभागृहात या विषयातील अनुभवी, अभ्यासू, नाविन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करणारे, दूरदृष्टी असणार्या व्यक्ती असणं महत्वाचे आहे . महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात अनेक पर्यावरणीय,संशोधनात्मक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक विषयातील प्रश्न आहेत आणि या सर्वच विषयात तज्ञ सहभागातून करण्यासाठी बरांच वाव आहे.
        भारतीय घटनेच्या आर्टिकल १७१ (५) नुसार राज्यपाल राज्य विधानपरिषदेवर सदस्य म्हणून विविध विषयतज्ञ,अभ्यासक,शास्त्रज्ञ, साहित्यीक, समाज सुधारक,संघटनेतील अनुभवी कार्यकर्ते, इ. यांची नियुक्ती करू शकतात. हि पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्रातील सजग जनतेने,विविध सेवाभावी संस्थांनी, पर्यावरण क्षेत्रातील तळमळीने कार्य करणार्या व्यक्तींनी एकत्रित येवून महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सहा विषयतज्ञांची नावे सुचविली आहेत. त्याबाबतचा राज्यपालांशी पत्रव्यवहार देखील झाला आहे. तसचं लोकसहभागातून सुचवलेली हि सहा नावे ऑनलाईन चेंज.ऑर्ग (change.org) http://chng.it/7pnQMFjWxJ या संकेत स्थळाच्या माध्यमातून लोकांच्या ऑनलाईन याचिकेसाठी, विनंती अर्ज महामहिम राज्यपालांना देण्यासाठी देखील निर्माण करण्यात आलं आहे. काही दिवसातचं शेकडो नागरिकांनी या लोक-नामनिर्देशीत विषय तज्ञांना पसंती दिली आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून लोक या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. 
      
     या ऑनलाईन विनंती अर्जात १.पर्यावरणतज्ञ -अभ्यासक, निसर्गशास्त्रज्ञ,विविध हरित चळवळीचे प्रणेते डॉ. सचिन अनिल पुणेकर
२. आर्किटेक् व हरित चळवळीतील कार्यकर्ते श्री. सारंग वामन यादवाडकर   ३. इंजिनियर व माहिती अधिकार या विषयातील जेष्ठ तज्ञ श्री. विवेक कृष्णाजी वेलनकर ,४.भूवैज्ञानिक व जल अभ्यासक उपेंद्र विलासराव धोंडे  ५. भविष्यातील नियोजन, शासकीय यंत्रणा, प्राध्यापक व पर्यावरण चळवळीच्या क्षेत्रात दीर्घ अनुभव असणारे डॉ. अनुपम दत्तात्रय सराफ आणि ६. जलभूवैज्ञानिक, भूजलतज्ञ डॉ. हिमांशू चंद्रकांत कुलकर्णी या विषयतज्ञांचा, समाजसेवकांचा राज्यपाल नियुक्त महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती व्हावी यासाठी त्यांच्या नावाचा समावेश आहे. 

 त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी गुगल लिंक येथे देत आहोत जेणेकरून या सदस्यांबाबत, त्यांच्या आजवर केलेल्या कामांबाबत,त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत संबधित लोकांना जाणून घेता येईल.
https://drive.google.com/folderview?id=11d7IgFiPXpd7zIKp4sHCsex--Bf-Ijr8

      त्यामुळे राज्यपालांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता भारतीय घटनेच्या आर्टिकल १६३ (२) व १७१ (५) नूसार आपले अधिकार वापरून वर नमूद विषयतज्ञांना-समाजसुधारकांना महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्रातील जनतेकडून होत आहे. 
 
Top