पुणे ,दि.२३/०६/२०२०,(डॉ कुणाल दोशी)  - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी रक्तदान करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून शिवसेना पुणे महिला आघाडीच्यावतीने आज दि.२३ जून, २०२० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब कलादालन,स्वारगेट,पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


 या रक्तदान शिबिराचे उदघाटन शिवसेना प्रवक्त्या तथा माजी उपसभापती विधानपरिषद आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले.


   यावेळी बोलताना आ.डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की,  बाळासाहेब शिवसेना महिला आघाडीला रणरागिणी सातत्याने म्हणत असत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना महिला आघाडी महाराष्ट्रात सातत्याने काम करत आली आहे. महिलांनी बहुदा पहिल्यांंदाच रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि मोठ्या संख्येने महिलां रक्तदान करीत आहेत ही कौतुकाची बाब आहे.  या रक्तदान शिबीरास आ.डॉ.गोऱ्हे यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच  मास्क, सोशल डिस्टेंसिंग पाळून उपक्रम राबविण्यात यावे असे देखील आवाहन केले. 

      यावेळी झूम द्वारे माजी आ.रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा कदम,महिला आघाडी संपर्क प्रमुख तृष्णा विश्वासराव यांनी शुभेच्छा दिल्या. माजी आ.चंद्रकांत मोकाटे,महादेव बाबर , शहर प्रमुख संजय मोरे, पुणे शिवसेना महिला आघाडी शहरसंघटिका सौ.सविता मते, सौ.संगिता ठोसर, जिल्हाप्रमुख स्वाती ढमाले, राधिका हरीचंदरे, सुदर्शना त्रिगुणाईत, नगरसेविका पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, नेहा कुलकर्णी, प्रज्ञा लोणकर, कविता अमे,सरोज कर्वेकर,सूरज लोखंडे यांच्या सह महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top