खर्डी, (संतोष कांबळे)- पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीला महापूर येऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून सात ते आठ महिने झाले, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

 महापुरामुळे बाधीत झालेला सोलापूर जिल्ह्यातील व इतर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र पंढरपूर तालुक्यातील शेतकरी अद्यापही शासनाच्या मदतीपासून वंचित राहिलेले आहेत, शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी याकरिता बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार जमादार यांना निवेदन देण्यात आले.

 यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी हरिदास पाटील, ज्ञानेश्वर जवळेकर, गोपाळ नाईकनवरे, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.
 
Top