शासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय निर्माण करून महिला, रोहयो आणि आरोग्य इतर कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार... आ.डॉ.नीलम गोऱ्हे
सामाजिक स्वयंसेवी संस्थाच्या दोन दिवसांच्या संपर्कसेतू अधिवेशनास सुरुवात...

       पुणे,(डॉ कुणाल दोशी),दि.१२/०६/२०२०- कोरोनाच्या संसर्गाच्या प्रादुर्भावमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे.नागरिकांना काम मिळत नाही तसेच स्वतःच्या घरी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर चालत जात असल्याचे समोर आले आहे. लोकांना मदत काम अहोरात्र स्वयंसेवी संस्था करत आहेत. लोकांना मदत करतांना येणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच्या समस्या माजी उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे संपर्क संस्थेच्या मेधा कुळकर्णी यांनी मांडल्या होत्या. याबाबत आ.डॉ.गोऱ्हे यांनी यासंदर्भात ऑनलाइनच्या माध्यमातून अधिवेशन घेण्यात यावी अशी सूचना मांडली होती. आज या स्वयंसेवी संस्थांच्या अधिवेशनात सुरुवात झाली आहे.यात झूम कॉन्फरन्सच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रा तील २५० सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधीने भाग घेतला होता.या अधिवेशनाचे अध्यक्षपद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देण्यात आले होते.

    कोरोनाच्या काळात या नुकसानात, हातचा रोजगार जाणे,पैशांची चणचण,आरोग्याची हेळसांड, शैक्षणिक नुकसान असे अनेक कंगोरे आहेत.अशा स्वरूपाच्या समस्यांवर दीर्घकाळा पासून काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना एकत्र बोलावून,त्यांच्याद्वारे सरकारला काही ठोस उपाय योजना सुचवायच्या असे उदिष्ट असल्याचे आ.डॉ. गोऱ्हे यांनी प्रास्ताविक दरम्यान सांगितले.

     महाराष्ट्र विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनाआधी वंचितांच्या समस्यांवर चर्चा करून, महाराष्ट्र सरकारला ठोस कृतिकार्यक्रम सुचविण्यासाठी आम्ही 'महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांचे ऑनलाईन अधिवेशन' भरविण्यात आल्याचे आ.डॉ.गोऱ्हे आणि 'संपर्क संस्था' आणि 'नवी उमेद' च्या मेधा कुळकर्णी, मिनार पिंपळे यांनी सांगितले. दोन दिवस 'संपर्कसेतू अधिवेशन' दि.१२ आणि १३ जून २०२० रोजी होणार आहे. विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली फेसबुक पेजच्या माध्यमातून हे अधिवेशन दि.१२ दुपारी २.३० ते ५.३० या वेळात लाईव्ह झाले.यात प्रामुख्याने ग्रामीण आणि नागरी समस्या, रोजगाराचे प्रश्न, महिला बालविकास आणि सामाजिक न्याय संबंधातील प्रश्न, तसेच आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्या या विषयांवर सखोल चर्चा झाली.

    या अधिवेशनाचा मूळ गाभा हा रोहयोच्या कामाचा होता. कोरोनामुळे बेघर झालेले कुटुंब तसेच शहरात काम मिळत नसल्याने शहरातील लाखो कुटुंब ग्रामीण भागात गेली आहेत. परंतु घरी परतल्यावर गावात रोहोयोच्या माध्यमातून कामे निर्माण करून देण्याचे काम सामाजिक संस्था करत आहेत. हे काम करत असताना येणाऱ्या अडचणीवर या अधिवेशनात चर्चा झाली. याबाबत आ.डॉ.गोऱ्हे यांनी प्रत्येक विभागीय आयुक्त यांच्याकडे पुढील आठवड्यात झूम कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात येईल असे सांगितले. तसेच ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर शहरी भागात देखील रोहयो योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

  राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे अधिवेशन कोविड -१९ चे परिणाम, सद्यस्थितीतील वंचितांच्या समस्या आणि त्यावरील उपाय याची चर्चा सत्रात पहिल्या दिवशी- १२ जून २०२० रोजी उद्घाटन आणि पार्श्वभूमी- आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. जे अधिवेशन दोन सत्रात झाले यात पहिल्या सत्रात ग्रामीण आणि नागरी समस्या: यात ग्रामीण समस्या मोहन सुर्वे (विकास सहयोग प्रतिष्ठान) आणि नागरी समस्या- रोशनी नगेहाळी (युवा) यांनी आपले विचार मांडले.

    दुसऱ्या सत्रात रोजगाराचे प्रश्न: यात शुभदा देशमुख (आम्ही आमच्या आरोग्यासाठी) आणि अश्विनी कुळकर्णी (प्रगती अभियान) यांनी आपले मत मांडले आणि शासन स्तरावर निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत मत मांडले.या सत्राचे सूत्र - संचालन नीरजा भटनागर, शिरीष कुलकर्णी यांनी केली. या अधिवेशनात तज्ज्ञ मार्गदर्शकांसह महाराष्ट्रातील २५० हून जास्त स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही झुमवरुन तर फेसबुक वरुन १२५०० प्रतिनिधी जोडले गेले होते. या ऑनलाईन अधिवेशनाचे आयोजक 'संपर्क' संस्थेच्या मेधा कुळकर्णी, 'प्रथम' च्या फरिदा लांबे व स्वयंसेवी संस्थांचे सल्लागार मिनार पिंपळे यांनी केले . या अधिवेशनाचे निमंत्रक 'संपर्क' संस्थेच्या मृणालिनी जोग ह्या होत्या.
 
Top