पंढरपूर - मार्च महिन्यात केंद्र व राज्यसरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक वृत्तपत्रांचे काही दिवस छपाई व वितरण थांबविण्यात आले होते.अचानक आलेल्या या संकटामुळे वृत्तपत्र स्टालधारक,विक्रेते व घरोघरी वाटप करणारे विक्रेते यांना खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. व्यवसाय पूर्णपणे बंद होते तर आता व्यवसाय ५० टक्क्यावर आला आहे. त्यामुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसने पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

     हे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर उपाध्यक्ष सचिन कदम, उपाध्यक्ष गिरीश चाकोते यांच्यासह देण्यात आले .
 
Top