पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन पंढरपूर यांनी दि.२९ जून २०२० रोजी पंढरपूर येथील कोवीड- १९ मध्यवर्ती सेंटरला वैद्यकीय विषयक साहित्य खरेदी करण्यासाठी सहकार्य करावे या मानवतेच्या भावनेतून ६०,०००/- साठ हजार रूपयांची आर्थिक मदत केली.

   पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील कोवीड -१९ मध्यवर्ती सेंटरला वैद्यकीय साहित्य पुरवठा करण्याचे ठरले. त्याप्रमाणे या साहित्यामध्ये पी.पी.ई. कीट, सॅनिटायझर मास्क, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्य खरेदी केले. सदर साहित्य कोवीड -१९ मध्यवर्ती सेंटर पंढरपूर यांना देण्यात आले.

   यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे,पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पंढरपूर नगरपरिषद पाणी पुरवठा अधिकारी भोसले, पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके या अधिकाऱ्यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्य कोवीड -१९ मध्यवर्ती सेंटर पंढरपूर यांना देण्यात आले.

  सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष गहिनीनाथ गावडे गुरूजी, खजिनदार रा.कि.उपळकर गुरूजी, सचिव सुभाष मोहोळकर गुरूजी, ग्रामीण सदस्य चंद्रकांत रसाळ,महादेव जाधव गुरूजी,ओझेवाडीचे शिक्षक तायाप्पा पवार, दाऊद मुलाणी गुरूजी, संस्थेचे सल्लागार लक्ष्मण शेळके गुरूजी या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
 
Top