मुंबई - उत्तरप्रदेशमधील योगी सरकारने गोहत्या रोखण्यासाठी नवा अध्यादेश काढला आहे.या नुसार गोहत्या करणार्‍याला १० वर्षे शिक्षा आणि ५ लक्ष रुपयांपर्यंत दंड असेल. योगी सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य असून हिंदु जनजागृती समिती त्याचे स्वागत करत आहे. नुकतेच केरळमध्ये गर्भीण हत्तीणीला फटाके असलेले अननस खाण्यास दिले, त्यात गंभीररित्या घायाळ होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला,हिमाचल प्रदेशात गायीला स्फोटके खाण्यास देऊन गंभीर रित्या घायाळ करण्यात आले. देशात प्राणी आणि गोमाता यांवरील अत्याचार अन् त्यांची हत्या रोखण्यासाठी कठोर कायदे नसल्यामुळेच अशी अमानवी कृत्ये करण्याचे धाडस वाढत चालले आहे. इतकेच नव्हे, तर गोरक्षणाचे कार्य करणार्‍या अनेक गोरक्षकांच्याही हत्या दिवसाढवळ्या होत आहेत. तपासात हलगर्जीपणा करत पोलीस आणि प्रशासनही बर्‍याचदा धर्मांध कसायांना मदतच करतात, असेच दिसून येते. हे सर्व पहाता, उत्तर प्रदेश सरकारने काढलेला अध्यादेश हा गोरक्षणा साठी अर्थात संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ, गोरक्षकां पासून ते सर्वसामान्य गोप्रेमींसाठी एक आशेचा किरण आहे. गोमातेच्या रक्षणासाठी केवळ उत्तरप्रदेशच नव्हे, तर संपूर्ण देशभरातच असा कठोर कायदा लागू करण्यात यावा , स्वतंत्र ‘गो-मंत्रालय’ स्थापन करण्यात यावे,अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे ही माहिती हिंदु जनजागृती समिती,महाराष्ट्र व छत्तीसगढचे राज्य संघटक,सुनील घनवट यांनी दिली आहे .
 
Top