एकल महिलांना रोहयोच्या अंतर्गत तात्काळ कामे उपलब्ध करून देण्यात येतील असे आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आयोजित केलेल्या सामाजिक संस्थांच्या संपर्कसेतू अधिवेशनात मनरेगा आयुक्तांनी दिले आश्वासन...
संपर्कसेतू अधिवेशनचा आज दुसरा आणि अंतिम दिवस...

पुणे,दि.१३/०६/२०२० - कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र शासनाचे पावसाळी अधिवेशन पुढे गेले आहे. परंतु सामाजिक स्तरावरील समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या काळात सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात रिलीफचे काम करत आहेत. हे काम करत असताना निर्माण झालेल्या समस्यां महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे मांडल्या होत्या. यात प्रामुख्याने रोहयो योजना, स्त्रियांच्या समस्या, स्थलांतरीत कामगारांना कामे उपलब्ध होत नाहीत, स्थलांतरीत कामगारांना गावी जाताना होणारे समस्या या व इतर समस्या सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधी यांनी सरकारकडून समस्यांचे निर्मूलन होण्याबाबत मागणी केली होती. कोरोनाच्या काळात प्रत्यक्षात भेट शक्य नसल्याने आ.डॉ.गोऱ्हे यांनी ऑनलाईन अधिवेशन घेण्याची कल्पना मांडली होती.आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. यात आ.डॉ.गोऱ्हे यांनी १४ व्या वित्त आयोग, जिल्हा नियोजन व मनरेगा येथील निधीचे विनियोजन करण्यासाठी सामजिक संस्थांची मदत घेण्याची सूचना मांडली. एकल महिलांना तात्काळ जॉब कार्ड देऊन कामे देण्याची देखील सूचना केली. आंबेगाव,लातूर आणि शहादा येथे रोहयोचे कामे मागितल्यानंतर धमकवण्यात आले आहे. त्याची चौकशी करून तेथील मजुरांना कामे देण्याची मागणी उपस्थित असलेल्या शासनाच्या अधिकार यांच्याकडे आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली.

या अधिवेशनात रोजगार हमी योजना,शिक्षण (ग्रामीण व शहरी),आरोग्य, महिला व बालकल्याण सह सामाजिक न्याय, उद्योजगता व शहरी रोजगार योजना,शेती व शेतकरी महिला, रेशन व कामगार या सात ही विषयावर सविस्तर चर्चा झाली. या विषयाच्या प्रश्नाचे सोडविण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे व हे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर मंत्री, सचिव यांच्याकडे आ.डॉ गोऱ्हे या संस्थांच्या मदतीने पाठपुरावा करणेचे ठरले. शाश्वत विकासातील १७ उद्दिष्टे बाबतही पर्यावरण विभागाच्या जिल्हानिहाय आराखड्यात हे मुद्दे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ठरले असल्याचे आ.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

आज या दुसऱ्या दिवसाच्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले, मनरेगा आयुक्त रांगा नायक यांनी भाग घेतला होता. दिवाळीनंतर रोहयो कामे सुरू होत नाहीत, प्रोत्साहन भत्ता मिळत नाही, कामे लवकर मंजूर होत नाहीत असे प्रश्न या अधिवेशनात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडले.यावर श्री नायक यांनी दिवाळीनंतर कामे सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तसेच प्रोत्साहन भत्ते मिळण्यात काही समस्या असतील तर ई-मेलच्या माध्यमातून तक्रार केल्यास त्याचे तात्काळ निवारण करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे काम मगितल्यानंतर काम मिळेल नाही तर मजुराला बेरोजगार भत्ता देण्यात येईल असे सांगितले.

यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी देखील या अधिवेशनात भाग घेतला होता. यात त्यांनी रोहयोची ६०% टक्के कामे हे कृषीची कामे असतात. यात वैयक्तिक स्वरूपाची कामांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच लोकांनी वैयक्तिक स्वरूपाची आणि सिंचनाची कामे घेण्याचे आवाहन देखील श्री डवले यांनी यावेळी केली. यात प्रामुख्याने विहीर, शेततळे होत आहेत. तसेच कोकणात खार पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे त्यामुळे तेथे बंध बांधण्याची कामांना तत्कालीन उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतल्यांनंतर ही कामे मंजूर करणेत आल्याचे श्री डवले यांनी यावेळी सांगितले.शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजना, २१०० कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात आली आहे.कृषी व कृषीपूरक व्यवसायांच्या विकासा साठी ही योजना असेल असे श्री डवले यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात महिला, बालविकास आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न , महिला आणि सामाजिक न्याय- सीमा कुळकर्णी (महिला किसान अधिकार मंच)
महिलासुरक्षा- अपर्णा पाठक (स्त्री आधार केंद्र) बालक- प्रीती पाटकर (प्रेरणा) याविषयी चर्चा झाली या सत्राचे सूत्रसंचालन सूत्रधार- सुप्रिया जान (कोरो इंडिया) यांनी केले.

तिसरे सत्र आरोग्याच्या समस्या: डॉ.शशिकांत अहंकारी (हॅलो मेडिकल फाउंडेशन) यांनी कोरोना आणि आरोग्य कसे सदृढ ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले. तसेच शिक्षणाच्या समस्या फरिदा लांबे (प्रथम) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सत्राचे सूत्रसंचालन जेहलम जोशी, स्त्री आधार केंद्र यांनी केले.
 
   या अधिवेशनाचे संयोजन व मुद्दे यांचे संचालन  मेधा कुळकर्णी आणि मिनार पिंपळे यांनीे केले. समारोप आ.नीलम गोर्हे यांनी केला व त्यात पाठपुराव्याची रुपरेषा मांडली.पुढील दोन महिन्यांत विविध विषयांवर मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे व विविध मंत्री तसेच सचिवांकडे पाठपुरावा करण्यात येईल असे जाहिर केले.
 
   या अधिवेशनाचे आभार प्रदर्शन मृणालिनी जोग (संपर्क) यांनी केले.या अधिवेशनात अशोक तांगडे,मनीषा तोकले,प्रमोद झिंजाडे,रमेश भिसे, शहाजी गडहिरे यांनी तळागाळातील मुद्दे मांडले.
 
Top