छत्रपती शिवरायांच्या नीतीचे अनुसरण करत ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी संघटित व्हा!-प्रमोद मुतालिक,अध्यक्ष,श्रीराम सेना

मोगलांच्या अत्याचाराने जनता पिडली जात होती, महिलांवर अत्याचार होत होते. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच सामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी यांना संघटित करून त्यांचे सैन्य निर्माण केले. त्यांच्यात देव, देश अन् धर्म रक्षणासाठी स्वाभिमान निर्माण केला. त्यातूनच पुढे तानाजी, सूर्याजीसारखे शूरवीर घडले. चातुर्य अन् कौशल्याच्या बळावर त्यांनी हिंदूंचे राष्ट्र स्थापन केले. आज आपल्यालाही त्याच नीतीचे अनुसरण करावे लागणार आहे; कारण आज कट्टरपंथीय जिहादी, ख्रिस्ती मिशनरी, राष्ट्रविरोधी कम्युनिस्ट आणि भ्रष्टाचारी यांचे भारतावर आक्रमण चालू आहे. त्याला एकच उत्तर आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग शिवछत्रपतींच्या नीतीचे अनुसरण करून देशाला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आपल्या सर्वांना संघटित व्हावे लागणार आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले.

   हिंदु जनजागृती समितीच्यावतीने ‘शिवराज्या भिषेक दिना’निमित्त ६ जूनला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होेते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष आणि मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ.चारुदत्त पिंगळे , समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनीही दर्शकांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या आरंभी सनातन संस्थेचे पू.रमानंद गौडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील रहाण्याची शपथ घेतली. हिंदु जनजागृती समितीचे सुमित सागवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमांतून थेट प्रक्षेपित करण्यात आलेला हा कार्यक्रम ४२ हजार लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर १ लाख ७ हजार लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला. 
 
Top