नातेपुते, (श्रीकांत बाविस्कर)- करोना सारख्या महामारीचा सामना करण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे यावे असे आव्हान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले होते. त्या आवाहनाला  प्रतिसाद देऊन मांडवे येथील विष्णु सोनटक्के व मित्रपरिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात ११५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


     देशसेवेचा देश प्रेमाचा ध्यास आज प्रत्येक मांडवेकरामध्ये ओसांडुन वाहताना दिसत होता. यावेळी बोलताना विष्णू सोनटक्के म्हणाले की, 
प्रत्येक रक्तदात्यांचा मी शतश: ऋणी असून
सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानतो.संपुर्ण जगातील,भारतातील हे कोरोना संकट लवकरच दुर होवो .अनेक रक्तदाते रक्तदान करण्यासाठी आले होते परंतु वेळेअभावी ते रक्तदान करु शकले नाहीत .


  यावेळी प्रत्येक रक्तदात्यास १८ लिटर पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला.
 
Top