दमला असाल तर येथे थोडावेळ बसा व थोडे जेवण करा व आपल्या घरी परत जावा अशी हात जोडुन विनंती करत आलेल्या वारकर्यांची एक प्रकारची सेवाच करत आहे हे पोलीस प्रशासन !
पोलीसांना आणलेल्या जेवणातील जेवण पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना देऊन त्यांना हात जोडून विनंती करून वारी भरणार नाही आणि मंदिर ही बंद आहे असे समजावून सांगून आलेल्या मार्गाने परत पाठवित आहेत.काही वारकरी हट्ट करत असताना अनेक जण वाखरीतूनच विठ्ठल रुक्मिणीला दंडवत घालून विठू माऊली लवकरच पुन्हा बोलावून घेऊन भक्ताची दर्शनाची आस पूरी करेल अशी आशा धरून परत जात आहेत.