नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)- येथील जि प प्रा कन्या शाळा,नातेपुते येथे पुस्तक वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास उपसरपंच सौ सुनंदा उराडे मॅडम, शा.व्य.समिती अध्यक्षा सौ मंगल राऊत,एन के साळवे, समीर सोरटे , मुख्याध्यापिका श्रीमती शांता शिंदे,विषय शिक्षिका सुनंदा जाधव,अलका खिलारे, उपशिक्षिका छाया गोरे, दिपाली दहिवाळ तसेच सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 


 यावेळी सौ.सुनंदा जाधव मॅडम यांनी १०० मास्क वाटप केले.श्रीमती शांता शिंदे यांनी १० दप्तरे,    व छाया गोरे मॅडम-वह्या, पेन्सिल ,अंकलीपी, इयत्ता (१ली ,२ रीच्या विद्यार्थ्यांना) वाटप केले.  


कार्यक्रमाच्या वेळी सर्वांनी मास्क लावून सोशल डिस्टंसिंगचे पालन केले.
 
Top