मुंबई - निवृत्‍ती वेतनधारकांकडून त्यांची जन्मतारीख,ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती मागविण्यासाठी माझ्या सहीचे पत्र माहिती व जनसंपर्क कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आहे. या पत्राला निवृत्तीवेतनधारकांकडून चांगला प्रतिसाद प्राप्त होत आहे. सदरील याच आशयाचे सही नसलेले पत्र व ई-मेल आयडीमुळे काही निवृत्तीवेतनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनाला आले आहे. खरेतर या माहितीचे संकलन करून निवृत्तीवेतन विषयक डेटाबेस अपडेट करणे हे निवृत्तीवेतनधारकांनाही हिताचे आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या मनात झालेला संभ्रम दूर व्हावा. निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे नाव ,जन्मतारीख,ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांकाची माहिती शक्य असल्यास
pao@mahakosh.in या मेल आयडीवर किंवा अधिदान लेखा कार्यालयाच्या पत्त्यावर कृपया पाठवावे.


त्यासाठी पत्ता-अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई लेखा कोष भवन, ए विंग वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई ४०००५१ 

यापूर्वी ज्या निवृत्तीवेतनधारकांनी माहिती पाठवली असेल त्यांनी पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही असे अधिदान व लेखा अधिकारी वैभव राजघाडगे यांनी कळविले आहे .
 
Top