मुंबई -निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेले निर्णय-उपाय योजनांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी पत्रपरिषदेत दिली.उपमुख्यमंत्री अजीत पवार , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते .

त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी बदललेल्या निकषांमुळे मदतीत दीड ते तीन पट वाढ होणार असल्याची माहिती दिली .

   पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजीत पवार म्हणाले,  कच्च्या-पक्क्या घराच्या नुकसानीसाठी पूर्वी ९५ हजार १०० रुपयांची नुकसान भरपाई, आता १ लाख ५० हजार इतकी मदत मिळणार आहे . अंशत: पडझड झालेली घरे तसेच नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी ६ हजार तर आता १५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे . गावात लहान-मोठी दुकाने, टपरी व्यवसाय करणाऱ्यांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहेत. ज्यांची घरे पूर्णत: क्षतीग्रस्त झाली आहेत त्यांना प्रति कुटुंब कपड्यांसाठी पूर्वी २५०० रुपये  तर २५०० रुपये भांडीकुंड्यांसाठी दिले जायचे. आता कपडे व भांडी यासाठी प्रति कुटुंब प्रत्येकी ५ हजार मदत मिळणार आहेत असेही उपमुख्यमंत्री बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाईसाठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपये, आता ५० हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार. ही नुकसानभरपाई २ हेक्टरच्या मर्यादेत मिळेल- उपमुख्यमंत्री गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुराने नुकसान झालेल्यांचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना केल्या . यासंदर्भातील प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागामार्फत पाठविण्यात येणार असल्याची माहिती अजीत पवार यांनी दिली.
 
      कोकणवासियांना पंतप्रधान आवास योजना, गृहनिर्माण विभाग यांच्यामार्फत पक्की स्लॅबची घरे बांधण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न. निसर्ग वादळामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी बांधवांना खावटी कर्जापेक्षा खावटी अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिल्या. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रति रेशन कार्ड ५ लिटर रॉकेल मोफत देणार असून या शिवाय त्यांना रेशनदुकानातून तांदूळ तसेच इतर धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी जाहीर केला.  
 
Top