शिक्षणासाठी परदेशी (किर्गिस्तान) गेलेल्या विद्यार्थ्यांना परत येणेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे मानले आभार...
पुणे दि.३०/०६/२०२० - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परदेशातील विद्यार्थी मोठ्या संख्याने महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्याथी/विद्यार्थिनी किर्गिस्तान या देशातील बिशकेक या शहरात वैद्यकीय शिक्षणा साठी (MBBS) वेगवेगळ्या विद्यापीठात प्रवेश घेतलेला होता . या शैक्षणिक वर्षाच्या नियमित परीक्षा पार पडलेल्या आहेत.

कोरोनाच्या प्रभावामुळे विमान वाहतूक बंद असल्यामुळे आम्ही सर्व विद्याथी/विद्यार्थिनी बिशकेक (Bishkek) या शहरात अडकून पडलो होतो. याबाबत अहमदनगरचे सुमित नजन यांनी शिवसेना प्रवक्त्या तथा माजी उपसभापती विधानपरिषद आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांना व्हाट्स एपच्या माध्यमातून संपर्क साधला. याबाबत आ.डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेत राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.आ. डॉ.गोऱ्हे यांच्या कार्यालयातील अधिकारी यांनी किर्गिस्तान येथील भारतीय दूतावास यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी रणनीती तयार केली. तसा पाठपुरावा महाराष्ट्र सरकारशी आ.डॉ.गोऱ्हे तसेच अधिकारी करत होते. याला यश आले आणि विद्यार्थी महाराष्ट्रात दाखल झाले.

यातील विद्यार्थ्यांनी ,आम्ही आपणास अतिशय अपेक्षेने व आत्मविश्वासाने संपर्क केला. आपणही आम्हास अगदी त्याच तत्परतेने आणि आत्म विश्वासाने प्रतिसाद दिला.आपण प्रशासकिय पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे आम्हास ताबडतोब विमानसेवा उपलब्ध होऊ शकली.आपण केलेल्या या सहकार्यामुळे व घेतलेल्या परिश्रमामुळे आम्ही आपआपल्या गावी पालकासमवेत पोहोचत आहोत.आपल्या ठायी विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता,आपली माणसे म्हणून प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, यामुळे आम्हास योग्य वेळी आपली मदत मिळू शकली. या सहकार्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे असलेला ओढा वाढण्यास निश्चितच मदत होईल .आम्ही आमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊ,आमच्या या यशा मध्ये आपलाही वाटा आहे याची आम्हाला कायमच जाणीव राहील,अशा शब्दांत या विद्यार्थ्यां च्यावतीने सुमित नजन यांनी आ.डॉ. गोऱ्हे आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
 
Top