मुंबई -कोवीड-१९ विरुद्धचा लढा संपलेला नसून तो सुरुच आहे . त्यामुळे सावध राहून कोरोना सोबत जगावे लागेल. कुठेही घाईगडबड किंवा गर्दी करून चालणार नाही. कोरोनाला दूर ठेवण्या साठी नागरिकांनी गर्दी टाळण्यासह सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले .

लाँकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले,तसेच ते टप्प्याटप्प्याने हटवत आहोत. मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या सवयी अंगी बाळगायच्या आहेत.गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करताना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे .

MissionBeginAgain अंतर्गत आपण काही नियम शिथिल केले, मात्र, पहिल्या दिवशी गर्दी झालेली दिसली, असे करू नका. सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची मुभा आरोग्यासाठी दिली, गर्दी करून आरोग्य बिघडविण्यासाठी नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

परिस्थिती हाताबाहेर जाताना किंवा जीवघेणी होताना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. पण, राज्य सरकार जनतेच्या हिताचेच निर्णय घेत आहे याची जनतेला कल्पना. राज्या तील नागरिक ती वेळ येऊ देणार नाहीत. शिस्त पाळून शासनाला सहकार्य करतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला .
 
Top