पंढरपूर -आज जागतिक पर्यावरण दिन.झाडे लावा,झाडे जगवा असा संदेश म्हणा किंवा इशारा म्हणा देणारा दिवस.


  अशा पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर येथील ६५ एकर परिसरात महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्यावतीने तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 


       यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके, तलाठी प्रशांत शिंदे, श्री.डोरले आदी उपस्थित होते.


     येथे सर्व प्रकारची फुल झाडे, तुळशी, मोगरा, जास्वंद,कडीपाला इत्यादी झाडे लावण्यात आली.
 
Top