*पोलीस स्टेशन आणि तहसिलदारांना निवेदन देऊन केला निषेध...*
  पंढरपूर,(विजय काळे)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुका व शहर यांचेतर्फे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण पवार, तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार पिरजादे यांना निवेदन देण्यात आले. 

    यावेळी तालुकाध्यक्ष दिपक पवार,शहराध्यक्ष सुधीर भोसले,युवकचे प्रदेश सचिव अरूण आसबे, शहर उपाध्यक्ष सचिन कदम, गिरीष् चाकोते,  सहसचिव कपिल कदम, सचिन सोळंखी , अनिल अभंगराव, रशिद शेख ,सलीम मुलाणी, महमद मुलाणी ,भाळवणी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे व महिला तालुकाध्यक्षा अनिता पवार, संगिता माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

    धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग यांचे निकष कायम आडवे आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याबाबत कधीच विरोधात नव्हती मात्र याबाबतच्या कायदेशीर अडथळ्यांवर माफ करण्यासाठी केंद्र सरकारचे आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या निकषांचा मोठा अडथळा ठरला परंतु गोपीचंद पडळकर हे केवळ आरक्षणाच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करून भाजपकडून पाठ थोपटून घेत आहेत. खा.शरद पवार यांनी ही अडचण लक्षात घेऊन धनगर समाजासाठी विशेष प्रवर्गाची निर्मिती केली याचा विसर गोपीचंद पडळकर यांना पडला आहे अशी टीका यावेळी करण्यात आली.
 
Top