नातेपुते(श्रीकांत बाविस्कर) :नातेपुते येथील स.म.शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात संस्थापक अध्यक्ष लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या त्रेसष्ठाव्या जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. 


  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुतेचे सरपंच अडव्होकेट बी.वाय.राऊत उपस्थित होते.  कळंबोलीचे माजी सरपंच राजेंद्र पाटील, नातेपुतेचे माजी उपसरपंच अतुल पाटील, जनसेवेचे कार्यकर्ते अप्पासाहेब रुपनवर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.  


   मान्यवरांच्या हस्ते नातेपुते येथील प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या ६३ व्या जयंतीचे औचित्य साधून ६३ गरीब होतकरू कुटुंबाला गरा, पोहे,  सोयाबीन तेल, अंगाचे व कपड्याचे साबण, साखर,चहा पावडर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. 

 महाविद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अँडव्होकेट बी.वाय.राऊत आपल्या  व्याख्यानातून लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना म्हणले, प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी काम केले. वंचितांना न्याय मिळवून दिला, कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. अशा या लोकनेत्यांना कधीच विसरू शकत नाही.   
   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर  प्रास्ताविकात म्हणाले, लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थाने बहुआयामी होते. त्यांच्या मनात सामान्य माणसां विषयी आस्था होती. त्यामुळेच ते शेवटपर्यंत सामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.  सर्वांनी त्यांच्या विचाराच्या अनुषंगाने वाटचाल करावी. 

   प्रा.डॉ. बाळासाहेब निकम यांनीही लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यांचा आढावा घेतला.

  सकाळचे वार्ताहर सुनिल राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणले, लोकनेते प्रतापसिंह  उर्फ पप्पासाहेब हे एक धाडशी नेतृत्व होते, त्यांच्या  कोणताही निर्णय धाडसाने घेत. पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा असे नेतृत्व डॉ. धवलसिंह मोहिते -पाटील यांच्या रूपाने पुढे येत आहे. 

  कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रज्जाक शेख यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय साळवे यांनी आभार मानले.

  या कार्यक्रमाला श्रीकांत बाविस्कर, दै.सुराज्य व दिव्यनगरीचे मनोज राऊत, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी शारीरिक व सामाजिक अंतर राखत उपस्थित होते.
 
Top