आज आषाढी वारी असती तर वाखरी येथे लाखो भाविकांनी रिंगण सोहळा डोळ्यात साठवला असता
   शेळवे,(संभाजी वाघुले) -या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्येक वर्षी भरणारी आषाढी वारी सुद्धा भरलेली नाही .यामुळे विठ्ठल भक्तांमधुन व सामान्य नागरिकांतुन वारीच्या व वाखरी रिंगण सोहळ्याच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. 

    भंडीशेगाव येथील ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या मुक्कामानंतर दुपारी १२ वाजता माऊलीचा पालखी सोहळा बाजीराव विहिरीवरील गोल रिंगणासाठी मार्गस्थ होत असतो .परंतु या वर्षी आषाढी सोहळा नसल्याने आज भंडीशेगाव व बाजीराव विहीरीवर फक्त आठवणीतील वारी दिसत आहे.
  
हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंढरपुर ,गादेगाव, उपरी,सुपली, भाळवणी,वाखरी,शिरढोण,कौठाळी, खेडभाळवणी , शेळवे , देवडे , वाडीकुरोली ,  भंडीशेगाव आदी गावांसह परगावाहुनही लोक माऊलीचे गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी एकच गर्दी करत असायचे. 

    लक्ष लक्ष नयनात हा रिंगण सोहळा भाविक साठवायचे व पुन्हा वर्षभरासाठी या वारीच्या आठवणीतच व विठ्ठलाच्या नामातच जीवन जगायचे. 

   बाजीराव विहीरीवरील रिंगण ठिकाणी रिंगणाला वेळ असल्यामूळे कोणी फुगडी खेळत तर कोणी भारूड गात तर कोणी भजन गात असायचे.आज याठिकाणी आल्यानंतर फक्त मागील वर्षीची सर्व चिञे डोळ्यासमोर ऊभी राहीली.

    आषाढी वारीतील बाजीराव विहीरीवरील हे शेवटचेच गोल रिंगण असायचे म्हणून हे रिंगण सोहळा प्रत्येकजण डोळ्यात साठवायचा.
  
 बाजीराव विहीर येथील गोल रिंगणाच्या ठिकाणी पालखीने फेरी मारून  माऊलीच्या पादुका रिंगण सोहळ्याच्या मध्यभागी ठेवलेल्या.यावेळी सर्वानीच हाथ उंचावून जागेवरूणच माऊलीचे दर्शन घेतलेले नंतर रिंगण सोहळ्यासाठी माऊलीचा अश्व व स्वाराचा अश्व रिंगणात दाखल झालेले व . चोपदारांनी रिंगण लावलेले.यावेळी माऊलीच्या रथाच्या पुढील मानाच्या दिंडीतील पताकाधारी व मानकरी यांनी गोल कडे केललेे .यावेळी चोपदारांनी अश्वाला गोल रिंगण दाखवलेले . स्वाराचा अश्व व माऊलीचा अश्व यांनी काही क्षणात रिंगणाच्या फेर्या पुर्ण केल्याल्या या सर्व गोष्टी जशाच्या तशा डोळ्यासमोर ऊभा राहील्या.
  
  यावेळी लाखो भाविकांनी माऊली माऊलीचा जयघोषांनी रिंगण परिसर दुमदूमलेला .यावेळी अश्व धावलेल्या ठिकाणची धूळ कपाळाला लावण्यासाठी एकच गर्दी झालेली सर्वच्या सर्व गोष्टी बाजीराव विहीर येथे आल्यानंतर जशाच्या  तशा डोळ्यासमोर आल्या.
 
Top