गणेश मंडळाचे कार्यकर्ते तथा हिंदुत्वनिष्ठ यांच्या वर सुडबुद्धीने केलेल्या हद्दपारी कारवाईमुळे
  नंदूरबार - गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाने बोलवलेल्या बैठकीत ‘वेळेत गणेश विसर्जन न झाल्यास थेट गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली. त्यावर ‘तुम्ही न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव मंडळां वर कारवाई करणार असाल, तर त्याप्रमाणे पहाटे ५.०० वाजता मशिदींवर वाजणार्‍या अवैध भोंग्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार का?’, असा रास्त प्रश्‍न हिंदुत्वनिष्ठ अन् गणेश मंडळे यांनी विचारला होता.त्यावर तत्कालीन नंदूरबार पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन यांनी सुडबुद्धीने कारवाई करत ७७ जणांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई केली होती . 

 या अन्याय्य कारवाईच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील आणि मयुर चौधरी यांनी न्यायालयात दाद मागितली होती.त्यावर सत्र न्यायालयाने हद्दपारीचा आदेश रद्द केला. तसेच दोघांनी हानी भरपाईसाठी मुंबई उच्च न्यायालया च्या औरंगाबाद खंडपिठात याचिका केल्यावर न्यायमूर्ती नलावडे आणि न्यायमूर्ती सोनावणे यांच्या खंडपिठाने पोलीस अन् प्रशासन यांना दोषी ठरवून १० हजार रुपयांची हानी भरपाई देण्यास सांगितले. मात्र ती हानी भरपाईची रक्कम वेळेत जमा न केल्याने पुन्हा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली.त्यावर न्यायालया च्या आदेशाने १० हजार रुपयांची भरपाईची रक्कम दोघा हिंदुत्वनिष्ठांना मिळाली आहे.

     या अन्याय्य हद्दपारीच्या विरोधात लढण्यासाठी डॉ. नरेंद्र पाटील आणि मयुर चौधरी यांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी , अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी मोलाचे साहाय्य केले अशी माहिती सुनील घनवट,राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र आणि छत्तीसगड
यांनी दिली आहे. 
 
Top