पंढरपूर, ०४/०६/२०२० - लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे परराज्यातून तसेस जिल्ह्यातील तसेच सोलापूर शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. रेड झोन क्षेत्रातून शासकीय कर्मचारी-अधिकारी,व्यापारी तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबधित नागरिकांचा सोलापूर शहरातील रेड झोन क्षेत्राशी संबंध येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी रेड झोनमधील नागरिकांशी अतिमहत्वाच्या कामा साठी व कमी वेळासाठी योग्य ती काळजी घेवूनच संपर्क ठेवावा. तसेच अनावश्यक कारणाने शहरात जाणे टाळावे. पंढरपूर तालुक्यात रेड झोन क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन व आरोग्य तपासणी बंधन कारक करण्यात आले असून, उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणाही सज्ज असल्याचेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

            

     तसेच पावसाळा सुरु असल्याने कोरोनाच्या संसर्गाबरोबच डेंग्यु, मलेरिया तसेच इतर साथीचे आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी अशा सूचनाही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

 
Top