बोले तैसा चाले
नव्हे देईल तैसा चाले
तोचि राजकारणी ओळखावा॥ 

वचनभंग त्यांची गुणवत्ता 
आश्वासने हीच मालमत्ता 
तोची नेता ओळखावा !!

जाईल तिथे भूखंड 
खातो फक्त श्रीखंड 
तोचि कारभारी ओळखावा॥ 

वाणीत गोडवा कृतित खोडवा 
देवाण घेण्या पक्का सर्वाना बुक्का 
तोचि अनुभवी ओळखावा॥ 

वरून शांत आतून अस्वस्थ 
नजर शिकारीवर 
तोचि राजकारणी ओळखावा॥ 

सर्वत्र गुंड पोसतो 
कळ लावण्यात एक्सपर्ट 
तोचि विजयी ओळखावा॥ 
गावरान टोला :

सत्ता मुक्त करताच  
राजकारणातील एक "नाथ "
देखील अनाथ होतो 
तेंव्हा मी निष्पाप आहे 
हे सांगताना विश्वास देखील गोठून जातो "!!

आनंद कोठडीया , जेऊर , जि.सोलापूर ९४०४६९२२००


 
Top