राम रहीम असूनही एकच 
धर्मवेडे जाळतात एकमेकांस येथे
असूनही सारखीच माणसं 
तरीही होतो भडका अस्मितेचा येथे !!१!!

ना उरले विझवनारे कोणी  
जाईल तिथे जथ्थे पेटवणारांचेच येथे 
कोंडमारा सत्याचा भरले तुरुंग सारे 
नाही गुंजभर वाव सत्याला येथे !!२!!

प्रत्येकजण झाले आहेत ठेकेदार देवदेवतांचे येथे 
देव देवताही पडतात थंड दगडही लाजतात येथे
!!३!!

पंचनामे तपास गुन्हे कागदोपत्री सोपास्कार येथे 
कोणा चाड इथे पुराव्याअभावी सारेच निर्दोष येथे !!४!!

कोण आहे महात्मा पेरण्या अहिंसा येथे 
गुन्हेगारच कारभारी नीतीचाच पंचनामा येथे!!५!!

आनंद कोठडीया ,जेऊर 
९४०४६९२२००
 
Top